वैद्य राजेश कपूर गुरुजी यांचे 24 एप्रिल 2023 रोजी मंडणगड येथे व्याख्यान

Google search engine
Google search engine

Lecture by Vaidya Rajesh Kapoor Guruji on 24th April 2023 at Mandangad

मंडणगड | प्रतिनिधी : हिमाचल प्रदेशातील राजगढ सिरमौर येथील वैद्य राजेश कपूर गुरुजी यांच्या व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम 24 एप्रिल 2023 रोजी मंडणगड येथील, शेठ गोशाळा येथे संध्याकाळी 6.30. ते 8.00 या वेळेत हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला असल्याचे माहीती शेठ्स कोकण विश्वचे संचालक सचिन शेठ यांनी दिली आहे. वैद्य राजेश कपुर यांनी संस्कृत विशारद ही पदवी प्राप्त केली असून पांरपारीक चिकीत्सा वनऔषधी, गोविज्ञान या विषयावर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये शोधप्रबंध सादर केले आहेत. 100 हुन अधिक वनस्पतींवर संशोधन व प्रयोग केले आहेत. गोवंश स्वदेशी चिकीत्सा व असाध्य रोगांचे उपचार पध्दती विकसीत केली आहे. सेवा शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असून स्वयंसेवी संस्थेचे माध्यमातून ट्रेस मँनेजमेंट या विषयात शासकीय कर्मचाऱ्यांचे समुपदेशनाचे सात वर्षे काम केले आहे. पाच दिवसांच्या प्रशिक्षणात विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास करण्याकरिता विविध कॉलेज व महाविद्यालयामध्ये काम केले आहे. संरक्षण दलाचे अधिकारी व नागा रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. पत्रकारितेते मोलाचे कार्य करुन विविध पुरस्कार मिळवीले आहेत. विविध विषयांमध्ये राष्ट्रीय स्तरावर काम करणारे गुरुजी 21 एप्रिल रोजी कोकण दौऱ्यावर येते असून त्याच्या ज्ञानाचा लाभ तालुकावासीयांनाही व्याख्यानाच्या अनुषंगाने प्राप्त होणार आहे