भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून वायरी येथील वेंगुर्लेकर कुटुंबियांना आर्थिक मदत

 

वडाचे झाड कोसळून झाले आहे नुकसान

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भुतनाथ येथील प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या घरा शेजारी असलेले वडाचे भलेमोठे झाड कोसळल्याची घटना चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसात मध्यरात्री घडली. सुदैवाने वेंगुर्लेकर बचावले मात्र यांच्या घराचे काही प्रमाणात नुकसान झाले.

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी गुरुवारी वेंगुर्लेकर कुटुंबियांची भेट घेत नुकसानीची माहिती घेतली. तसेच भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आर्थिक मदत दर्शन प्रदीप वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, भाजपा पदाधिकारी केदार झाड, देवानंद लोकेगावकर, राम चोपडेकर, जयवंत सावंत, गणेश सातार्डेकर आदी उपस्थित होते.