राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आरिफ आदम बामणे यांना आयुष्यभर मोफत आरोग्य सेवा
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांचे दातृत्व पुन्हा एकदा जनतेने अनुभवले आहे. काही दिवसांपूर्वी गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या बोट अपघातात तब्बल 35 लोकांचे जीव आरिफ आदम बामणे यांनी वाचवले. अनेकांचे जीव वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे यांना आमदार निलेश राणे यांनी राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आयुष्य भर मेडिकल (आरोग्य सेवा सुविधा) मोफत उपलब्ध करून दिली आहे.
काही पक्षांनी आरिफ बामणे यांचा वापर फक्त फोटो काढण्यासाठी केला. परंतु आमदार निलेश राणे साहेब यांनी एक कोकणी माणूस या नात्याने आरिफ बामणे यांची मेडिकलची जबाबदारी स्वीकारली.
अंधेरी ऑफिस मध्ये बोलवून त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपचे अध्यक्ष सलमान गांगू, जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख उपस्थित होते.
निलेश राणे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











