भाजपा पदाधिकारी यांनी केली पाहाणी : भाजपा युती शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर इमारत दुरुस्ती होणार असल्याचे केले स्पष्ट
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरी बांध येथील नवीन दत्तमंदिर बाजूला असणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले असून विटाही कोसळल्या आहेत. यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. सध्य स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात लगतच्या शाळेतच्या एका खोलीत मुलांची बैठक व्यवस्था करण्यात आहे. तरी अंगणवाडी इमारतीचे छप्पर तातडीने दुरुस्त व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थ यांनी भाजपा पदाधिकारी यांचे लक्ष वेधत समस्यां सोडवण्याची मागणी केली.
दरम्यान, भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, शक्तीकेंद्र प्रमुख केदार झाड, सरपंच मृणाली मयेकर, अजिंक्य पारकर, जयवंत सावंत, मेघनाथ मयेकर यांनी भेट देऊन पहाणी केली.
दरम्यान, इमारत नादुरुस्त बाबत प्रशासन अधिकारी यांचे लक्ष वेधण्यात आले. लवकरात लवकर अंगणवाडी इमारत दुरुस्ती बाबत कार्यवाही व्हावी असे सांगण्यात आले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यास आम्ही प्रयत्नशील असल्याचे धोंडी चिंदरकर यांनी सांगितले. तर लवकरात लवकर इमारत दुरुस्ती करून दिली जाईल असे धोंडी चिंदरकर, बाबा परब यांनी ग्रामस्थांना सांगितले.












