पालकमंत्री उदय सामंत आणि सामंत कुटुंबीयांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून उपक्रम
संतोष कोत्रे | लांजा -: आजचे विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत .आणि म्हणूनच राजकीय हेतू बाजूला ठेवून या सर्व विद्यार्थ्यांची असलेली गरज लक्षात घेऊन पालकमंत्री उदय सामंत आणि सामंत कुटुंबीयांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांना आज छत्री वाटप केले जात आहे. सामाजिक जाणिवेतूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी लांजा येथे केले .

पालकमंत्री उदय सामंत आणि तसेच रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत आणि अपूर्वा सामंत व सामंत कुटुंबीय यांच्यावतीने संपूर्ण लांजा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सामाजिक जाणीवेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून याच अनुषंगाने लांजा जिल्हा परिषद शाळा क्रमांक पाच या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आज शुक्रवारी १९ जुलै रोजी सकाळी पार पडला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरूप्रसाद देसाई हे बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर लांजा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मनोहर बाईत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप चौगुले, शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण, नगरसेविकास समृद्धी गुरव, दुर्वा भाई शेट्ये ,मृदुला बापेरकर, तसेच नगरसेवक बापू लांजेकर, लल्या कुरूप, नगरसेवक सचिन डोंगरकर ,शिवसेना पदाधिकारी राजू धावणे तसेच प्रणिता बोडस, मंगेश बापेरकर, महेश बामणे प्रसाद भाई शेट्ये तसेच प्रवीण जेधे, माजी पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
या उपक्रम सामाजिक जाणिवेतून राबविला जात असल्याचे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई यांनी सांगितले. यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक विश्वनाथ सुर्वे यांनी केले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.










