तिसंगी बर्गे वाडी मधील घटना
खेड(प्रतिनिधी) खेडमध्ये विजेच्या धक्क्याने गायीसह गुराख्याचा दुर्देवी मृत्यू होण्याची घटना तालुक्यातील तिसंगी बर्गेवाडी येथे घडली आहे. वीजखांबावरील तुटलेल्या विद्युतभारीत वीजवाहिनीला झाल्याने गायीसह गुराख्याचा मृत्यू झाला आहे.
गेले काही दिवस कोकणात वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच पडझडीच्या घटना घडल्या आहेत. गायीसह गुराख्याचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच खेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक नावले पोलीस उपनिरिक्षक केंद्रे घटनास्थळी रवाना झाले .









