श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाचे यश !!

 

तालुका विज्ञान मेळावा 

दोडामार्ग l प्रतिनिधी :दोडामार्ग तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात’कृत्रिम-बुद्धिमत्ता संभाव्यता व आव्हाने’

या विषयावरील सादरीकरणात श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय,पिकुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी सानिका संतोष गवस हिने दोडामार्ग तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल दोडामार्ग तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीम.रूपाली तेलतुंबडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आहे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 मध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूलची चिन्मयी जयसिंग खानोलकर प्रथम तर माध्यमिक विद्यालय सोनावलची खुशी गवस दुसरी आली आहे तर पिकुळें हायस्कूल ची सानिका संतोष गवस तृतीय आली आहे

राज्य विज्ञान परिषद रवी नगर नागपूर, शिक्षणाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग , गटशिक्षणाधिकारी कार्यालय दोडामार्ग व जिल्हा विज्ञान मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोडामार्ग मध्ये पार पडला. यामध्ये दोडामार्ग तालुक्यातील 10 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात दोडामार्ग इंग्लिश स्कूल ची कुमारी चिन्मयी जयसिंग खानोलकर ही प्रथम आली तर माध्यमिक विद्यालय सोनावलची कुमारी खुशी गवस ही द्वितीय आली या दोन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आजच्या या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याच्या निमित्ताने कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती दोडामार्गच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती रूपाली तेलतुंबडे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अरविंद साळगावकर विस्तार अधिकारी श्रीमती दीपा दळवी , सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे खजिनदार श्री राजाराम फर्जंद, दोडामार्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री आनंदा बामणीकर, विषयतज्ञ श्री सोनवलकर व श्री सावंत उपस्थित होते. सदर मेळाव्याचे मूल्यमापन दीपक भाई केसरकर विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री नितीन चौगुले व श्री अनुराग सिनारी यांनी केले. स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नाईक व आभार सौ. कोरगावकर यांनी मांडले.