अक्कलकोट वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे 9 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात!

मसुरे | झुंजार पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विधमान नगरसेवक श्री महेशजी (मालक) कल्याणराव इंगळे हे 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्राना भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत अक्कलकोट श्री वटवृक्ष देवस्थानचे विश्वस्त, स्वामी सेवेकरी, स्वामीभक्त आदी सुमारे शंभर जण उपस्थित राहणार आहेत. स्वामी भक्तांची श्रध्दा व तीर्थक्षेत्र अक्कलकोट प्रेमाने स्वामी दर्शनाला येणाऱ्या भावीकांच्या सदिच्छा भेटीला येत आहे.अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानीतील नित्यदिन पूजा अर्चा व मठात वार्षिक साजरे होणारे सण याची माहिती सुद्धा या भेटीत ते देणार आहेत. सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता देवगड तालुक्यातील हडपीड मठात स्वागत, सकाळी ९ ते १० अल्पोपहार,

सकाळी ११-३० वा. हृडपीड मठातून कणकवली श्री भालचंद्र महाराज मठाकडे रवाना, दुपारी १२ ते १ पर्यंत दर्शन,महाप्रसाद,

दुपारी २ वाजता पिंगुळी कुडाळ- सदगुरु राऊळ महाराज मठ, सायंकाळी 5.30 वाजता टेंबेस्वामी महाराज मठ (माणगांव) दर्शन आणि रात्रौ महाप्रसाद होईल.

मंगळवार १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ मठ (मिठ मुंबरी),

सकाळी १० वाजता – कुणकेश्वर मंदिर,दुपारी : ११ वाजता – रामेश्वर मंदिर आचरा,दुपारी : १२ वाजता वायंगणी श्री स्वामी समर्थ मठ येथे दर्शन महाप्रसाद,

दुपारी ३ वाजता आंगणेवाडी श्री भराडी देवी जत्रोत्सव उपस्थिती आणि दर्शन. 11 फेब्रुवारी 2026 रोजी

श्री स्वामी समर्थ मठ हृडपीड पूर्ण वेळ मठात विविध कार्यक्रमाना उपस्थित असणार आहेत. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ हडपिडचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे आणि संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर यांनी केले आहे.