कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ गांवकर कुटुंबियांचे दातृत्व

 

मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित टोपीवाला हायस्कुलला देणगी संपूर्द : गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी होणार सायकल वितरण

अमित खोत | मालवण : मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी कै. शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ गांवकर कुटुंबियांच्या वतीने उद्योजक केदार गांवकर यांनी प्रशालेस तीन लाख देणगी स्वरूपात देण्यात आले.

दरम्यान, 2 लाख 75 हजार रक्कम प्रशाला बँकेत ठेव स्वरूपात ठेवणार असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित केली जाणार आहे. यावर्षी 3 ऑगस्ट रोजी कै. शैला गांवकर यांच्या जन्मदिन निमित्ताने 25 हजार रक्कमेतून चार गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित केली जाणार आहे.

यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटी संस्था चालक डी. व्ही. सामंत, जी. व्ही. सामंत, संस्था सेक्रेटरी विजय कामत यांसह भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाऊ सामंत, महेश मांजरेकर, योगेश लोके, संतोष गांवकर, सुबोध गांवकर, अनिल तेरसे यांसह अन्य उपस्थित उपस्थित होते.