शिरोडा नाक्यावर मुख्य मार्गावर माड उन्मळून पडला

 

विद्युतभारीत वाहिन्यांसह वीज खांबही रस्त्यावर

सुदैवाने अपघात टळला : दुतर्फा वाहनांची कोंडी

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील जुना शिरोडा नाका येथे मुख्य मार्गालगत असलेला माड उन्हाळून रस्त्यावर पडला. सदरचा माड विद्युत वाहिन्यावर पडल्याने विद्युत भारितवाहिन्यांसह लगतच असलेला विजेचा खांबही रस्त्यावर आडवा झाला. सुदैवाने या घटने वेळी त्या ठिकाणी असलेल्या वाहनचालकांसह लगतच्या दुकानदारांनी मोठा आवाज झाल्याने बाजूला धाव घेतल्याने अनर्थ टळला.

 

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी तसेच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून विद्युत खांब तसेच विद्युत वाहिन्या बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सदरचा माड व विद्युत काम रस्त्यावरच आडवा असल्याने दोन्ही बाजूला वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. सदरची वाहने पर्यायी मार्गाने मार्गस्थ केली जात आहेत. दोन्ही बाजूने एसटी बसेस देखील अडकल्या असून त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत.