तटरक्षक दलातर्फे उभारण्यात येणारा जहाज दुरूस्ती प्रकल्प

Google search engine
Google search engine
तटरक्षक दलाचे अतिरिक्त महानिर्देशक के. आर. सुरेश यांनी रत्नागिरी दौर्यात घेतला आढावा 
 रत्नागिरी | प्रतिनिधी : तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख कमांडर अतिरिक्त महानिर्देशक के. आर. सुरेश, यांनी आज रोजी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरीस्थित तटरक्षक दलाच्या किनारी आणि सागरी यूनिट्सच्या कार्यातत्परतेबाबत आणि चालू व प्रस्थावित विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. रत्नागिरी येथील तटरक्षक दलाद्वारा उभारण्यात येणारा ट्रॅवल लिफ्ट आणि बर्थिंग सुविधा असलेला जहाज दुरूस्ती केंद्र हा या दौर्‍यातील केंद्रबिंदु होता. तटरक्षक दलातर्फे उभारण्यात येणारा हा पहिलाच जहाज दुरूस्ती प्रकल्प आहे.
 फ्लॅग अधिकार्‍याद्वारे जवानांना केलेल्या संबोधनात त्यांनी तटरक्षक दलाच्या कर्तव्यांच्या सनदेतील कार्यांच्या निर्वाहनासाठी सागरी आणि हवाई प्रयत्नांना मजबूत करण्याच्या उपायांवर भर दिला