ओटवणे(प्रतिनीधी)
ओटवणे देवुळवाडी येथील सीमा कमलाकर माटेकर यांच्या बंद घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराचे मोठे अर्थिक नुकसान झाले. संध्याकाळी मुसळधार पावसासह सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या परीसरात झाडे उन्मळून पडण्याबरोबर या घराच्या नजिक विद्युत वाहिन्या वर झाड पडून विद्युत वाहिन्याही तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. ज्या घरावर हे झाड पडले त्या घरातील व्यक्ती मुम्बई येथे राहत असल्यानं घरात कुणीही नव्हत त्यामुळे मोठी दुर्घटना टळली यात अर्थिक हानी मात्र झाली. ही घटना संध्याकाळी उशिरा घडल्याने पंचनामा होवू शाकला नाही त्यामुळं नक्की नुकसान किती झाले ते कळले नसले तरी अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाले.












