देवगड प्रतिनिधी :
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी देवगड तालुक्याच्या रुग्ण कल्याण सल्लागार समितीची सभा सायंकाळी ठीक 3 वाजता होणार आहे . ही बैठक देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या महत्त्वाकांक्षी योजनेची देवगड तालुक्यातील सर्व सरपंच यांची आढावा बैठकही सायंकाळी ठीक 4 वाजता देवगड पंचायत समिती कार्यालय सभागृह येथे आमदार नितेश राणे घेणार असून यामध्ये या योजनेचा दाखल अर्जांच्या प्रगतीचा आढावा घेऊन कार्यवाही याबाबत योग्य सूचना देणार आहेत.सदर बैठकीस सर्व सरपंच यांनी उपस्थित राहून सदर योजनेचा आढावा सादर करावा,असे सूचित करण्यात आले आहे.












