सह्याद्री कुणबी संघातर्फे २५ रोजी मोफत वाचनालयांचा शुभारंभ

 

खेड (प्रतिनिधी) जिथे जिथे शाळा-तिथे तिथे वाचनालय’ या संकल्पनेतून सह्याद्री कुणबी संघ-पुणे शहरच्या
माध्यमातून खेड व दापोली तालुक्यात २५ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत मोफत वाचनालयांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

 

 

 

तालुक्यातील संत तुकाराम हायस्कूल – अणसपुरे, न्यू इंग्लिश स्कूल होडखाड, न्यू इंग्लिश स्कूल पन्हाळजे, न्यू इंग्लिश स्कूल तुंबाड व दापोली तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल दमामे येथे वाचनालये सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून त्यांना भौगोलिक ज्ञानप्राप्ती करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे नितीन शिगवण यांनी केले आहे.