खेड (प्रतिनिधी) कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी बोगद्याजवळील दुर्घटनेपासून गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या धो-धो पावसामुळे रेल्वेगाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक अखेर सोमवारी ‘सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ५ गाड्यांचा अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना हायसे वाटले.
सोमवारी उधना – मंगळूरसह सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस २ तास तर दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटे उशिराने मार्गस्थ झाल्या. सावंतवाडी-दिवा पॅसेंजर १ तास २० मिनिटे विलंबाने धावली तर पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस ६ तास विलंबाने रवाना झाली. हा अपवाद वगळता सर्वच रेल्वेगाड्या नियोजित वेळेत रवाना झाल्या.












