कुडोपी गावाला चक्रीवादळाचा तडाखा

अनेकांच्या छप्पराच्या नुकसानीबरोबरच फळझाडेही उन्मळून पडली

आचरा–अर्जुन बापर्डेकर
गुरुवारी दुपारी आलेल्या चक्रीवादळाचा फटका मालवण तालुक्यातील कुडोपी गावाला जोरदार बसला.यात अनेकांच्या घरावर झाडे पडून नुकसान झाले . तसेच कौले,पत्रे उडून जाण्याबरोबरच मोठमोठी झाडे,केळी उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.


गुरुवारी दुपारी झालेल्या चक्रीवादळात कुडोपी येथील अरविंद पडवळ यांच्या घरावर सुपारी रामफळाचे झाड पडल्याने त्यांच्या पत्र्याच्या छप्पराचे नुकसान झाले.संतोष चंद्रकांत पडवळ यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने त्यांच्या घराची चिरेबंदी भिंत कोसळली.भास्कर धनावडे यांच्या घराच्या छप्पराचे नुकसान झाले.भरत पडवळ घप्पराचे नुकसान, सुभाष पेडणेकर यांच्या घराचे पत्रे कौले उडाली,दिनानाथ पडवळ यांच्या घराची कौले उडाली.


दिपक पडवळ , प्रकाश पडवळ,आनंद पडवळ ,प्रविण मुणगेकर,दिनानाथ पडवळ,विजय पडवळ, सचिन पडवळ,
नंदकुमार पडवळ आदींची केळीची झाडे,फणस,सागाची झाडे उन्मळून पडली.सदानंद पेडणेकर यांच्या घराचे नुकसान झाले.याबाबत येथील ग्रामस्थ. बंड्या पडवळ,राजू हिर्लेकर आदींनी महसूल प्रशासनास याची खबर दिली आहे.आचरा पोलीसांकडून दुपारी या भागाची पाहणी करण्यात आली होती.