आजचा दिवस कसा जाईल?
26 जुलै 2024 – शुक्रवार
मेष रास
आज इतरांशी असलेल्या कटकटी आणि वाद मिळतील. सुट्टी घ्या आणि आराम करा. एखादा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. काही वेळ ध्यान केल्यास, एकांतात शांत बसल्यास तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
वृषभ रास
आज नवीन कामाची सुरुवात करायची असल्यास ती करता येईल. अनपेक्षित घटना घडतील. आज स्वतःवर आणि त्या महान शक्तीवर विश्वास ठेवा. तुमची कामे होतील. वेळेवर मदत मिळेल.
मिथुन रास
आज “तुम्ही हात लावाल त्याचे सोने कराल” त्यामुळे काय निवडायचे याचा विचार करा. गरजेपुरते काहीही करा. अति लोभ करण्याने नुकसान होईल. आराम करण्याची इच्छा होईल. प्रॅक्टिकल विचार करा. कामात यश मिळेल.
कर्क रास
आज तुम्हाला उपयोगी पडेल असा सल्ला मिळेल. प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊन काम करा. फोकस हलू देऊ नका. “नजर हटी दुर्घटना घटी” त्यामुळे दूरदृष्टी ठेवा. योग्य सल्ला, आत्मविश्वास आणि नाविन्यतेचा पाठपुरावा केल्यास दिवस छान जाईल.
सिंह रास
आज नवीन संधी मिळेल त्याचा उपयोग करून घ्या. नवीन सुरुवात होईल. त्याकडे लक्ष दिल्यास यश आणि पैसा दोन्ही मिळेल. लग्नाचे प्रपोजल मिळू शकते त्याचा विचार करा.
कन्या रास
आज मानसिक त्रास होईल. एखादी वाईट बातमी कळु शकते. दुःख करत बसण्यात अर्थ नाही हे समजून घ्यावे लागेल. तुमच्याबद्दल चुकीचे आणि अपमान जनक बोलले जाऊ शकते. इतरांचे ऐकून स्वतःबद्दल वाईट विचार करत बसू नका.
तुळ रास
आज जाणीवपूर्वक एखादे काम करा. रिसर्च करा. मनापासून काम करा. काही सोयी सुविधांचा तसेच आरामाचा त्याग केलास काही महत्त्वपूर्ण गोष्टी हाती लागतील. प्रवास करण्याची इच्छा होईल. जुन्या अडचणीतून बाहेर पडण्याचा तुमचा प्रयत्न राहील. काही वेळ ध्यान आणि प्रार्थना केल्यास चांगले यश मिळेल.
वृश्चिक रास
आज आयुष्यात मोठे बदल घडतील. मनापासून ठरवून एखाद्या नात्यातून, घडणाऱ्या परिस्थितीमधून बाहेर पडा. नोकरीत बदल, ट्रान्सफर होऊ शकते. जॉब सोडण्याचा विचार डोक्यात येईल.
धनु रास
आज जीवनात छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. कौटुंबिक लाईफ चांगले असेल. घर आणि काम दोन्ही ठिकाणी सपोर्ट मिळेल. पैशाची कामे होतील. यश मिळेल. एखादे काम, प्रोजेक्ट, लाभ मिळवून देईल. चांगली खरेदी होईल.
मकर रास
आज तुम्हाला मनःशांती आणि सुख समाधान मिळेल. नातेसंबंध सुधारतील. प्रेम तसेच विवाहाचे प्रपोजल देण्या – घेण्याचा विचार करू शकता. चांगल्या बातम्या कळतील.
कुंभ रास
आज नवीन रस्ता सापडेल. घरातले न लागणारे सामान टाकून द्या. कचरा साफ करा. घरापासून दक्षिण दिशेकडून लाभ होईल. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका.
मीन रास
आज स्वतःकडे लक्ष द्या. तुमच्या कष्टाचे फळ पैसे, गिफ्ट, अवॉर्ड, मानसन्मान, कपडे, इत्यादी रुपात मिळेल. स्वतःसाठी काही छानसे खरेदी करा. आनंदात भर पडेल. थोडावेळ एकांतात घालवल्यास लाभ होईल. कामात यश मिळेल.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353












