जानवळे कोंडविलकरवाडी येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

 

एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळाचा उपक्रम 

मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील जानवळे कोंडविलकरवाडीतील एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ आयोजित शालेय विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ चिपळूणकर निवास येथे संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष शंकर चिपळूणकर,कार्याध्यक्ष सुधीर कोंडविलकर,उपाध्यक्ष संजय कोंडविलकर,सचिव विश्वनाथ कोंडविलकर,सहसचिव कु.राजेश कोंडविलकर,खजिनदार दत्ताराम कोंडविलकर,सहखजिनदार संदीप कोंडविलकर, जेष्ठ नागरिक रामदास कोंडविलकर,सल्लागार राजेंद्र कोंडविलकर,सुरेश चिपळूणकर,रमेश कोंडविलकर,सदस्य मंगेश कोंडविलकर,सुभाष कोंडविलकर,योगेश चिपळूणकर,राजेश म.कोंडविलकर,जितेंद्र कोंडविलकर,तेजेश कोंडविलकर , राजाराम सावर्डेकर ,किशोर चिपळूणकर,विलास जालगावकर तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रमात सचिव विश्वनाथ कोंडविलकर,सुधीर कोंडविलकर व अध्यक्ष शंकर चिपळूणकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले,तसेच ज्येष्ठ नागरिक रामदास कोंडविलकर यांनी मनोगत व्यक्त केले.

तसेच ग्रामदेवता विकास मंडळ जानवळेचे नवनिर्वाचित खजिनदार विश्वनाथ कोंडविलकर यांचाही सत्कार करण्यात आला. तद्नंतर अंगणवाडी,ज्युनियर के. जी.सिनियर के. जी. आणि इयत्ता पहिली ते बारावी तसेच विशेष डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी निमिष कादवडकर यांनी एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ एकता नगर जानवळे चे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानले.तसेच अल्पोपहार सुद्धा देण्यात आले.

एकता कमिटी नवतरुण मित्र मंडळ चे कार्याध्यक्ष सुधीर कोंडविलकर यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाचे समारोप केले.