मसूरे | झुंजार पेडणेकर
मालवण तालुक्यातील वडाचापाट बौद्धवाडी येथील वहाळावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी पुलावरून जाते. पाण्याचा वेग जास्त असल्याने वाहतूक बंद असते. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी भाजप नेते निलेश राणे यांच्याकडे केली होती. शनिवारी निलेश राणे यांनी वडाचापाट बौद्धवाडी येथील त्या पुलाची पाहणी करत कार्यवाही साठी आश्वासित केले. यावेळी ग्रामस्थांनी निलेश राणे यांचे आभार मानले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष गावकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राकेश सावंत, सरपंच सोनिया प्रभूदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, विनायक प्रभुदेसाई, दर्शना कासले, गुरूदास पालव, प्रथमेश पालव, श्रीकांत पाटकर, दिनेश चव्हाण, प्रवीण पाताडे, बाबी कासले, अरुण कासले, रोहित कासले, श्रीकृष्ण कासले, संतोष कासले, रामचंद्र कासले, भानुदय कासले, पुरुषोत्तम कासले, उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.











