वसंत गावकर यांची भाजपा मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी

 

भाजपा नेते निलेश राणे यांनी केले अभिनंदन

मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष मच्छिमार सेल मालवण शहर अध्यक्षपदी वसंत गावकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजपा मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरस्कर, भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी ही निवड जाहीर केली. भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते भाजपा मालवण कार्यालय येथे गावकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजन वराडकर, राजन सरमळकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, राजू बिडये, महेश मांजरेकर, नारायण धुरी, राकेश सावंत, निशय पालेकर, दाजी सावजी, आबा हडकर, ममता वराडकर, पूजा सरकारे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.