भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड येथे वह्या वितरण 

 

 

मालवण | प्रतिनिधी : भाजपा नेते निलेश राणे यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वितरण करण्यात येत आहेत. पुर्ण प्राथमिक केंद्र शाळा सुकळवाड येथेही विद्यार्थ्यांना वह्या वितरित करण्यात आल्या.

 

यावेळी मुख्याध्यापक नांदोस्कर सर, प्रकाश पावसकर, अजिंक्य पाताडे, चेतन मुसळे, सागर कुशे, प्रसाद मोरजकर आणि शिक्षक पालक उपस्थित होते.

 

विध्यार्थ्यांना वह्या उपलब्ध करून देण्याचा निलेश राणे यांचा स्तुत्य उपक्रम आहे. असे सांगत उपस्थितानी निलेश राणे यांचे आभार मानले.