प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुक

दिव्यांग शिक्षकांना उमेदवारी देणार्या पँनेलला दिव्यांग कर्मचारी संघटना पाठिंबा देणार ….जिल्हाध्यक्ष विलास गोरे

लांजा |  प्रतिनिधी :  जिल्हा प्राथमिक प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत दिव्यांग शिक्षकांना उमेदवारी देणार्या पँनेलला दिव्यांग कर्मचारी संघटना पाठिंबा देणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी दिली.
याबाबत बोलताना विलास गोरे म्हणाले की,समान संधी समान हक्क यानुसार आज पर्यंत प्राथमिक, माध्यमिक शिक्षक पतपेढीत दिव्यांग शिक्षक संचालक म्हणून निवडून आलेले नाहीत. अगर कोणत्याही पँनेलने उमेदवारीही दिलेली नाही पण गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रत्नागिरी जिल्हा शाखेने 34 आस्थापना मध्ये दिव्यांग कर्मचारी शिक्षक यांचे प्रश्न शासकीय स्तरावर सोडवून संघटनेच्या माध्यमातून मजबूत पकड निर्माण करून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांचे संघटन केले आहे. याची परिणिती जिल्हा परिषद सेवक पतपेढीत दिपक माने यांना निवडून आणले आहे आता माध्यमिक शिक्षक पतपेढीत आनंद त्रिपाठी यांच्या शिक्षण क्रांती पँनेलने शहाजी कोळी यांना उमेदवारी दिल्यामुळे संघटनेने शिक्षण क्रांती पँनेलला संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यातील मोठ्या प्राथमिक शिक्षक पतपेढीत गेल्यावेळी दिव्यांग संघटनेने आपला स्वतंत्र उमेदवार उभा करुन लक्षणीय मते घेतली होती. यावेळी जे पँनेल दिव्यांग संघटना सभासद दिव्यांग शिक्षक यांना उमेदवारी देईल त्यांना महाराष्ट्र राज्य दिव्यांग शिक्षक संघटना पूर्ण पाठिंबा देईल. अगर पतपेढी निवडणुकीत जिल्हा भरात आपले उमेदवार उभे करुन आव्हान एकजुटीच्या माध्यमातून उभे करण्याचे सुतोवाच अध्यक्ष विलास गोरे, जिल्हा सरचिटणीस आनंद त्रिपाठी, उपाध्यक्ष अनंत घवाले, कार्याध्यक्ष अशोक जायभाय, संघटक व्यंकटेश आटक, महिला प्रमुख सौरवी जाधव, रेणुका उपाध्याय मानसी शिंदे, शितल देवळेकर यांनी निर्धार व्यक्त करुन .प्रतिनिधीत्व मिळविणारच असा मनोदय व्यक्त केला आहे