जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा

गुहागर | प्रतिनिधी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020 ) च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 22 जुलै २०२४ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत शिक्षण सप्ताह सर्वत्र साजरा करण्यात आल. या सप्ताहात जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. 2 शाळेत विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

 

 

पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध कृती केल्या यामध्ये पूर्वतयारी स्तर या गटात तक्ते बनविणे अन्न आणि भाजीपाला, स्थानिक बाजारपेठ, माझे कुटुंब इत्यादी विषयाची तक्ते बनविले. रंगपेटी अंतर्गत घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून पेट्या तयार. केल्या फळे भाज्या प्राणी पक्षी यांची कार्ड तयार केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्राणी पक्षी आणि इतर विविध प्रकारचे मुखवटे बनविले. वाचन कट्टा आणि कथाकथन सत्र यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गोष्टी सादर केल्या. सप्ताहाचा दुसरा दिवस पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. आबलोली बीटचे विस्तार अधिकारी मान. रायचंद गळवे साहेब यांनी शाळेला आकस्मिक भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध गणिती कृती, लेखन पूर्व व गणनपूर्व कृती करून घेतल्या. विद्यार्थ्यांना वाचन करायला लावलं. इयत्ता दुसरी मधील विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केलं शाळेने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020 ) मध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा महत्वपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणात स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे. या खेळांच्या माध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून तिसरा दिवस शाळेत क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मच्याऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे. सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या हेतूने शाळेत हा दिवस सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्याच्यामध्ये कौशल्य निर्माण केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्याप्रमाणात साध्य होऊ शकते या हेतूने हा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या अंतर्गत विविध कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी यावीत या हेतूने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. शिक्षणात तंत्रज्ञाचा दिवस या अंतर्गत पालक आणि विद्यार्थी यांना डिजिटल माध्यमांची ओळख व्हावी याहेतूने डिजिटल साधनांची ओळख करून देण्यात आली. यांध्ये दीक्षा अॅप, विद्यांजली पोर्टल, स्वयम पोर्टल ,यांची माहिती देण्यात आली.
या सप्ताहातील सहावा दिवस इको क्लब फॉर मिशन लाईफ डे / शालेय पोषण दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत नैसर्गिक जीवनशैलीचे महत्व पटवून देण्यात आले. या प्रसंगी पाचेरी आगर केंद्राचे केंद्र प्रमुख विश्वास खर्डे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या समवेत वृक्षारोप केले. सप्ताहातील शेवटचा दिवस समुदाय सहभाग दिवस म्हणून साजरा करण्यात आला. विद्यांजली पोर्टलवर शाळेची नोंदणी करण्यात आली. स्वयंसेवक नोंदणी करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. या सप्ताहात शाळेचे मुख्याध्यापक दिनेश काशिनाथ जाक्कर यांनी उत्तम नियोजन करून कार्यक्रमाची अमलबजावणी केली. त्यांना त्यांचे सहकारी प्रदीप बोंद्रे यांनी सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी कार्यासाठी मा. लीना भागवत गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांनी प्रेरणा दिली, अबलोली बीटचे विस्तार अधिकारी रायचंद गळवे आणि पाचेरी आगर केंद्राचे केंद्र प्रमुख विश्वास खर्डे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्ष मनस्वी ठोंबरे आणि पालक यांचे उत्तम सहकार्य लाभले. अशाप्रकारे शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.