खेड(प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी खेड जेसीज व शिवाजीयन्स फुटबॉल क्लब, खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्ष गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला.
याच स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून इ. ११ वी विज्ञान
जे ई ई वर्गातील आयुष सदाशिव राठोड याची निवड आली. या स्पर्धेच्या यश्स्वीतेकरिता क्रीडा शिक्षक संतोष भोसले तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश रेवाळे , ऋतुज बेंडखळे, यश चव्हाण यांचे सहकार्य लाभले.










