बुरंबावडे बौध्दआदर्श मंडळाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न 

 

कणकवली :         तालुक्यातील बुरंबावडे बौध्दआदर्श मंडळाच्या होणाऱ्या सुवर्ण महोत्सव २०२५ निमित्त बुरंबावडे बौध्दवाडी येथे रविवार दिनांक १४ जुलै २०२४ रोजी मुंबई व ग्रामीण मंडळाच्या कार्यकारिणी व सभासद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जागतिक तापमान वाढ लक्षात घेता पर्यावरणाचा -हास होण्यापासून वाचण्यासाठी जनजागृती व भविष्यात पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

*’एक व्यक्ती एक झाड’* या संकल्पनेतून दरवर्षी हा उपक्रम आयोजित केला पाहिजे, असे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष मा. सदानंद शिगे यांनी सांगितले. या उपक्रमाला मुंबई मंडळाचे अध्यक्ष मा. विजय शिंगे, राजेश सावंत, प्रमोद शिंगे, अरविंद शिंगे, सचिन सावंत, गौतम शिंगे, भारत शिंगे तसेच ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस सदानंद कांबळे, ज्येष्ठ सभासद संभाजी शिंगे व महिला सदस्या सौ. राजश्री शिंगे, श्रीम. राजश्री जाधव उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना झाडाचे रोप मंडळाच्या वतीने भेट देण्यात आले.