माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील श्री देव केदारनाथ विद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनी सैनिकांसाठी स्वनिर्मित राख्या पाठवल्या.
राख्या बनवण्याच्या कामी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतः राख्या तयार करून देशाच्या संरक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबपासून दूर राहून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांना या राख्या पोस्टाने पाठवण्यात आल्या.व शुभेच्छापत्र पाठवले.
या सैनिकांचे देशाप्रती असलेले महान कार्य कळावे, शौर्य कळावे व विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना जागृत व्हावी यासाठी ,एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. श्री देव केदार विद्यामंदिर आरवली मधील मुख्याध्यापक अमोल सरनोबत, शिक्षक संदीप बोथले सौ.स्वरूपा कनगुटकर, सौ विजया चोरगे यांनी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.











