खेड(प्रतिनिधी) मे महिन्यात झालेल्या वादळी चाऱ्यासह मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे शहरातील समर्थनगर येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर महाकाय वृक्ष कोसळून निवासाची पडझड झाली आहे. टीकेची झोड उठल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर दोन निवासस्थानावर कोसळलेला वृक्ष हटवत परिसर मोकळा केला.
गटविकास अधिकाऱ्यांच्या निवासासाठी समर्थनगर येथे निवासस्थान उभारण्यात आले आहे. या निवासस्थानात मोजक्याच गटविकास अधिकाऱ्यांनी वास्तव्य केले आहे. निवासस्थानाच्या देखभालीसह दुरूस्तीकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याने निवासस्थान धोकादायक स्थितीत होते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून निवासस्थानकाचा वापर होत नव्हता. त्यातच मे महिन्यात निवासस्थानावर महाकाय वृक्ष कोसळून निवासस्थानाची दैनिय अवस्था झाली होती.
हा वृक्ष हटवण्यासाठी प्रशासनाला सवड मिळत नव्हती. प्रशासनावर टीकेची झोड उठवल्यानंतर दोन दिवसापूर्वीच निवासस्थानकावर कोसळलेल्या या महाकाय वृक्षाच्या फांद्या छाटत परिसर पूर्णपणे मोकळा करण्यात आला आहे. दरम्यान, पूर्वीपेक्षा निवासस्थानाची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून पावसामुळे निवासस्थान जमिनदोस्त होण्याच्या
मार्गावर आहे.








