मेष रास
आज सतत काही ना काही काम मागे लागेल. घरात काही अडलेली कामे असतील तर ती करा. विद्यार्थ्यांना पूर्वी केलेल्या अभ्यासाचा उपयोग होईल. शेती, डेरी, प्रॉपर्टी, ऍग्रो टुरिझम क्षेत्रातल्या व्यक्तींना लाभ होईल.
वृषभ रास
आज आनंदात भर पडेल. मनाप्रमाणे घटना घडतील. एखादी फार दिवसापासून असलेली इच्छा पूर्ण होईल.
मिथुन रास
आज घरापासून थोडे दूर जा. तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी काम करा. स्वतःमध्येच गुंतलेले राहिल्यामुळे काही कामांकडे दुर्लक्ष होईल. गणेशाचे दर्शन घ्या, लाभ होईल.
कर्क रास
आज सजगपणे काम करा. तुमच्याविषयी अफवा पसरवल्या जाऊ शकतात. हृदयाला ताण देणाऱ्या घटना घडू शकतील. इतरांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा.
सिंह रास
आज सगळीकडे तुमचा दरारा राहील. स्त्रियांशी वागताना भान ठेवा. आज नजर लागण्याची शक्यता आहे. मारुतीरायाचे दर्शन घ्या.
कन्या रास
आज तुमची दूरदृष्टी आणि मुत्सद्दी स्वभाव तुम्हाला यश मिळवून देईल. इतरांवर प्रभाव पडेल. एखाद्या अधिकारी व्यक्तीसोबत विशेष गाठभेट होण्याचे योग आहेत.
तुळ रास
आज प्रत्येक कामात यश मिळेल. करिअरमध्ये चांगल्या गोष्टी घडतील. नवीन नातेसंबंध जुळतील. घरात शुभ बातम्या कळतील. दैवी मदत मिळेल.
वृश्चिक रास
आज इतरांचा विचार करा. मामा, मावशी, तसेच इतर भावंडाच्या गाठीभेटी होतील. त्यांना मदत करावी लागू शकते. नातेसंबंधात असलेला दुरावा नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करा.
धनु रास
आज तुम्हाला पूर्वभास होतील. सिक्सथ सेन्स काम करेल. घडणाऱ्या गोष्टींची पूर्वसचना तुम्हाला मिळाल्यामुळे त्यानुसार नियोजन करता येईल. स्वतःवर विश्वास ठेवा. एखादे सीक्रेट आज तुम्हाला कळू शकते. देवीचे दर्शन घ्या. आशीर्वाद घ्या. लाभदायक राहील.
मकर रास
आज जरा सावध राहा. भाजी चिरताना, स्वयंपाक करताना सांभाळून कामे करा. घरातील लहान मुलांना आगीपासून लांब ठेवा. रागामुळे नुकसान होईल. त्यामुळे आदळ आपट चिडचिड करू नका. शक्यतो प्रवास करू नका अगदीच आवश्यक असेल तर सर्व खबरदारी घेऊन पुढे जा.
कुंभ रास
आज जे सत्य समोर आहे त्याकडे डोळे झाक करू नका. विचारांना दिशा द्या. स्वतःमध्ये बदल करा.
मीन रास
आज कामात गती आणण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखा. पैशासंबंधीत कामे होतील. गुंतवणुकीचा विचार करा.
@Ritikaslifetherapies
रितिका – ज्योतिष आणि अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++±++++++++++++++++++++












