आजचा दिवस कसा जाईल?
16 जुलै 2024 – मंगळवार
मेष रास
आज तुमच्या प्रत्येक कामात अडचणी येतील. गैरसमज होतील. विचार करण्यात आणि निर्णय घेण्यात अडचणी येतील. मन अशांत होईल. महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आजचा दिवस ढकलायचा प्रयत्न करा.
वृषभ रास
आज इतरांशी लढण्यात वेळ आणि शक्ती वाया जाईल. जे योग्य आहे त्यासाठी जरूर लढा. क्षणाक्षणाला तुमची मतं बदलणार नाहीत याची काळजी घ्या. तुमचा विश्वास आज कमी पडेल.
मिथुन रास
आज काहीही झाले तरी शांत रहा. तुमच्या सल्ल्याचा फायदा इतरांना होईल. तुमचा वैचारिक व भावनिक समतोल आणि समजूतदारपणा पाहून इतर व्यक्ती प्रभावित होतील.
कर्क रास
आज आपलं कुठे चुकत आहे याचा विचार करा. इतरांकडून आलेल्या संधीचा तुम्ही किती विचार केला? मित्रांनी देऊ केलेल्या मदतीचे पुढे काय झाले? त्याचे तुम्ही काय केले? ह्या सगळ्याचा विचार केल्यास उगाच मनात निर्माण केलेली भीती तुम्हीच कशी निर्माण केली याची जाणीव होईल. स्वतःवरती काम करा.
सिंह रास
आज स्वतःभोवती न पटणाऱ्या विचारांच्या भिंती तुम्ही उभ्या करू शकता. घाईत निर्णय घेणे टाळा. स्वतःशी प्रामाणिक रहा. जे आवडते ते करा. मन आणि बुद्धीच्या गोंधळात कुठलेच काम करणे जमणार नाही.
कन्या रास
आज जे आहे ते जपण्याच्या नादात नवीन संधी हातातून जाऊ शकतात. फक्त संपत्ती विषयी विचार करू शकता. पहिली संपत्ती हे तुमचे शरीर आहे हे लक्षात घ्या. भौतिक सुखाच्या मागे धावताना हेल्थ कडे दुर्लक्ष होऊ शकते.
तुळ रास
आज एकटे बसणे अशक्य वाटेल. तुमच्या सिक्थ सेन्स चा वापर न करण्यामुळे अडचणीत येऊ शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. कामे होण्यात अडचणी येईल. घेतलेले निर्णय चुकतील.
वृश्चिक रास
आज इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. थोडी परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल. निराशेचा सामना करावा लागेल. आज विश्वासू व्यक्तीच्या सल्ल्याने काम करा. तसेच देवदर्शन करा अडचणीतून मार्ग मिळेल.
धनु रास
आज तुमचा रस्ता चुकण्याची शक्यता आहे. प्रवासात मदत घेऊनच पुढे जा. इतरांवर भरोसा ठेवा, पण त्यापेक्षा स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. कंटाळा येईल. थकल्यासारखे वाटेल. स्पष्टता मिळणार नाही.
मकर रास
आज स्वार्थीपणाने विचार करू शकता. तुमच्या कामाच्या पद्धतींचा इतरांना त्रास होऊ शकतो. बोलण्यापूर्वी योग्य शब्दांची निवड करा. चुकून अथवा ठरवून, मुद्दाम गोष्टी घडवून आणू शकता.
कुंभ रास
आज जुन्या चुका, जुनी दुःख, यांना घट्ट पकडून ठेवण्यात वेळ जाईल. नुकसान झाले आहे हे तुम्ही मान्यच करणार नाही. आज शरीरात वेदना होऊ शकतात. वेळीच हेल्थ कडे लक्ष देण्याची गरज आहे.
मीन रास
आज कामात यश मिळेल. चांगल्या वाईट प्रत्येक कामासाठी तयार राहा. दिवस आनंद देऊन जाईल. चांगल्या बातम्या कळतील.
@Ritikaslifetherapies
Riitu – The TAROT – ASTRO Consultant
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++++