जादूगार विनयराज यांचा विविध मानाच्या पुरस्काराने सन्मान 

रत्नागिरी : रत्नागिरीचे सुपुत्र प्रसिद्ध जादूगार विनयराज यांना १६ एप्रिल रोजी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय जादू परिषद आयोजित जादू संमेलनात जादू भूषण पुरस्कार व जादूविशारद सन्मान मिळाला. विनयराज यांना लखनौ येथील वर्थी वेलनेस फाऊंडेशन कडून राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

 

तसेच २७ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या दांडी, मालवण येथे होणाऱ्या गाबीत महोत्सवात जादूगार विनयराज यांना गाबीत समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.