रत्नागिरी | प्रतिनिधी
शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील शेडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना शनिवार 24 जुलै रोजी रात्री 9.10 ते 25 जुलै रोजी सकाळी 9 वा. कालावधीत घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विरेंद्र गोविंद गोताड (35,रा.कारवांचीवाडी फाट्याजवळ,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,शनिवार 24 जुलै रोजी रात्री आपल्या मालकीची दुचाकी (एमएच-08-एएन-7787) ही घराच्या शेडमध्ये पार्क करुन ठेवली होती. दुसर्या दिवशी सकाळी ते घराजवळील शेडमध्ये गेले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












