शासनाच्या सर्व योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार – आमदार नितेश राणे

वैभववाडीत घरेलु कामगार व बांधकाम कामगार नवीन नोंदणी शिबिर संपन्न

भाजपा कार्यालयात नोंदणीसाठी कामगारांची मोठी गर्दी

वैभववाडी प्रतिनिधी
शासनाच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ हा प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी लागणारे सर्व सहकार्य भाजपाच्यामार्फत केले जाईल. योजना कोणतीही असो समाजातील शेवटच्या घटकाला याचा लाभ मिळण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी दिला.

घरेलू कामगार व बांधकाम कामगार नोंदणी व नूतनीकरण शिबिर वैभववाडी भाजपा कार्यालयात पार पडले. या नोंदणी शिबिराला आमदार नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, कामगार मोर्चा भाजपा महाराष्ट्र सरचिटणीस हनुमंत लांडगे, जिल्हाध्यक्ष अशोक राणे, प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत, वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, वैभववाडी महीला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, जिल्हा सचिव रोहन गुरव, यतीन गावडे, भक्ती परब व पदाधिकारी उपस्थित होते.

कोणतीही नवीन योजना आली की त्या विरोधात विरोधकांचे टोळक तयार असते. या योजनेत देखील कोणी फसवाफसवी करत असेल तर सांगा. त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे नितेश राणे यांनी सांगितले. कामगार मोर्चा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचा मेळाव्याचे आयोजन लवकरच केले जाईल असे यावेळी नितेश राणे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार, महिला, युवक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.