सहकार, सामाजिक, राजकीय पदाधिकारी व मित्रमंडळींच्या उपस्थित मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा..
मनिष दळवी यांचे सहकार आणि राजकीय क्षेत्रातील भविष्य उज्वल : माजी खास.निलेश राणे
वेंगुर्ले l दाजी नाईक :आपल्या शांत आणि संयमी स्वाभावामुळे मनीष दळवी यांनी नारायण राणे साहेबांना अभिप्रेत असलेले काम करून मागील पावणेतीन वर्षात सिंधुदूर्ग जिल्हा बँकेचे नाव एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्यांचा कामातील प्रामाणिक पणाच त्यांना भविष्यात सर्व पदांवर बसवेल आसा विश्वास आमदार नितेश राणे यांनी मनीष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देताना व्यक्त केला. तर आपले काम निष्ठेने करणारे आणि आपल्या कामात तडजोड न करणारे मनिष दळवी यांचे सहकार आणि राजकीय क्षेत्रातील भविष्य उज्वल आहे असे प्रतिपादन यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. दरम्यान सहकार, सामाजिक, राजकीय पदाधिकारी व मित्रमंडळींच्या उपस्थित मनीष दळवी यांचा वाढदिवस तुळस येथे रात्री शुभेच्छांच्या वर्षावात साजरा झाला.
तुळस येथील उत्सव हॉटेल येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, डॉक्टर प्रसाद देवधर तसेच महेश सारंग, प्रमोद कामत, नारायण सावंत, एम के गावडे, प्रज्ञा परब, अंकुश जाधव, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, वसंत तांडेल, राजेंद्र म्हापसेकर, शरद चव्हाण, प्रितेश राऊळ, कमलेश गावडे, ज्ञानेश्वर केळजी, बाबा परब, दिलीप गिरप, संदीप पेडणेकर यांच्या सह












