इतरांपेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा आहे; समाजसेवक म्हणून काम करा 

 

खा. नारायण राणे यांचे रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन 

विस्तारित जिल्हा कार्यकारिणीत पक्ष बळकट करण्याचा एकमुखी निर्णय 

रत्नागिरी । प्रतिनिधी :इतरांपेक्षा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता वेगळा हवा. हेच वेगळेपण भाजपाची विचारधारा आहे. ते आत्मसात करा. समाजसेवक म्हणू काम करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून आपले वरिष्ठ नेते प्रत्येक क्षण या देशासाठी आणि पक्षासाठी प्रत्येक क्षण देतात, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षनिष्ठा ठेऊन रत्नागिरीत पक्ष भक्कम करा आणि आपला हक्क ठणकावून मागा अशा शब्दात माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीतील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

रत्नागिरी शहरात आज चिपळूण- संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा राजापूर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासाठी जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संबोधित करताना खा. राणे बोलते होते. ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्या असताना आपलं सरकार पुन्हा यावं यासाठी हि बैठक महत्वाची आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे यासाठी हि बैठक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगती पथावर नेले आहे. महिला, कृषी, बेरोजगार, गरीब अशा समाजातील प्रत्येक घटकांसाठी त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना कुठलीही जात पाट धर्म पाहिला नाही. लोकसभा निवडणुकीत हि माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो आहोत असे खा. राणे म्हणाले.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत देशाचा विचार करत असतात. या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सतत काम करत असतात. अशावेळी आपण पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काय काम करतो कोणत्या पद्धतीने करतो याची आत्मपरीक्षण केले पाहिजे. भाजपचा कार्यकर्ता वेगळा हवा, तयाव्हे वेगळेपण हीच भाजपचा विचारधारा आहे. ती आत्मसात करा. रत्नगिरीतील भाजपचा पक्ष भक्कम करा, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत जागा हव्या असतील तर ते हक्काने आणि ठणकावून मागा असेही खा. राणे यांनी सांगितले.

 

रत्नागिरीतील पक्ष संघटना भक्कम करा असे सांगत खा. राणे म्हणाले कि पक्षाला मजबूत करण्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतारा, आपल्या नेत्याबद्दल कोणी काहीही विरोधात बोलले तर निषेध करण्यासाठी तत्काळ रस्त्यावर उतरा. गेले काही दिवस उद्धव ठाकरे, जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत अशावेळी पक्ष म्हणून आपल्या नेत्याच्या पाठही भक्क्म उभे राहा. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या बूथ मध्ये आपण मागे आहोत त्या बुथमधील विरोधातील प्रत्येक लोकांना भेटा. उद्धव ठाकरे हे स्वार्थी आणि सायकिक आहे, ते तुमचं भलं करणार नाही फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जातीपातीचे धर्माचे राजकारण करत आहेत तर पंतप्रधान मोदी मात्र देशातील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र काम करत आहेत हे या लोकांपर्यंत पोहोचावा. कोकणातील वातावरण हे सलोख्याचे वातावरण होते. सगळेचजण एकमेकांचे सण उत्सव एकोप्याने साजरे करत होते मात्र लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी जाती धर्मात निर्माण केलेली तेढ दूर करून हे कोकण हि रत्नागिरीचा विकास करण्यासाठी काम करूया यासाठी आवाहस्यक निधी आम्ही उपलब्ध करून देऊ येत्या पाच वर्षातील विकासाचा आराखडा तयार करूया आणि कामाला लागूया असे आवाहन खा. नारायण राणे यांनी उपस्थित भाजप कार्यकत्यांना केले.

 

यावेळी व्यासपीठावर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार, भाजप प्रवक्ते अवधूत वाघ, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, ज्येष्ठ नेते बाबासाहेब परुळेकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला भाजपचे ध्वजवंदन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि महाराष्ट्र गीत गावून बैठकीला सुरुवात झाली.

 

यावेळी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल नरेंद्र मोदी, ४० वर्षानंतर भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल निरंजन डावखरे आणि महाराष्ट्र राज्याच्या लोकोपयोगी योजनांमुळे युतीचे अभिनंदन करणार ठराव एकमुखाने मांडण्यात आला. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार ज्येष्ठ विधीतज्ज्ञ बापूसाहेब परुळेकर यांच्यासह ज्ञात अज्ञात मृत झालेल्या व्यक्तीना श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १० वर्षात देशाला भक्कम केले आहे, देश विकासाच्या वाटेवर चालत असल्यामुळेच विरोधक जाती धर्माचे राजकारण आणून इथली शांतता बिघडवत आहेत. पण केंद्र आणि राज्य सरकारने जात धर्म न पाहता केवळ सर्वसामान्यांचा विकास व्हावा या दृष्टीने अनेक योजना आणल्या आहेत हा विचार ज्यांनी लोकसभेत विकासाच्या विरोधात मतदान केले त्यांच्या पर्यंत पोहोचवलं पाहिजे. विरोधकांना आपला देश एकत्र राहू नये असे वाटत असल्याने ते अशी धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. या मतदार संघाचेही दिन भाग झाले आहेत. त्यातील एक भागातील जनता विकासाला विरोध करत आहे, त्यांची दिशाभूल केली जात आहे त्यानं योग्य दिशा दाखवण्याची काम भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आहे. यासाठी अशा प्रत्येक बुथवर जावून मत आणि मन परिवर्तन करा तरच आपलं विजयाचं ५१ टक्क्याचं गणित पूर्ण होईल असे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

यावेळी भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ, माजी आमदार बाळ माने, प्रमोद जठार यानेही मार्गदर्शन केले. तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रास्ताविक केले.