माहितीअंती ते मालवाहतुक जहाज असल्याचे निष्पन्न ; मुंबईच्या दिशेने रवाना
देवगड : प्रतिनिधी
कुणकेश्वर समुद्रात सोमवारी एक महाकाय जहाज दिसल्याने एकच खळबख उडाली.पोलिस व कस्टम विभागाने या जहाजाबाबत माहिती घेतल्यानंतर हे जहाज मालवाहतुक असल्याचे व संशयास्पद काहीही नसल्याचे समजताच सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
श्रावणातील पहिल्याच सोमवारी कुणकेश्वर तीर्थक्षेत्री पोलिस बंदोबस्त असताना सायंकाळी ६ वा.सुमारास कुणकेश्वर समुद्रात पोलिस यंत्रणेला १० नॉटीकल मैल अंतरावर एक महाकाय जहाज थोबलेले दिसले.यामुळे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट झाली.तात्काळ पोलिस व कस्टम विभागाने कोस्टगार्डची मदत घेवून जहाजाबाबत माहिती घेण्यास सांगीतले. यावेळी ते जहाज मालवाहतुक जहाज असून मुंबई नावाशिवा येथे जात असल्याचे व जहाजावर संशयास्पद काहीही नसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला प्राप्त झाली यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.हे जहाज अर्धा ते पाऊण तासानंतर मुंबईच्या दिशेने रवाना झाले.