कोंड कारुळच्या सुपुत्राला जि.प.पु.प्राथ.कोंडकारुळ – बोर्या शाळेने केले सन्मानित!

 

 

मा.प्रसन्न जागकर यांनी मिळवला गावातील पाहिले पो.उप निरीक्षक होण्याचा मान!

पालशेत:(वार्ताहर)            गुहागर तालुक्यातील कोंड कारुळ गावचे सुपुत्र मा.श्री.प्रसन्न अनिल जागकर यांना जि.प. पु.प्राथ.कोंड कारुळ – बोर्या शाळेने समारंभपूर्वक सन्मानित केले.श्री.प्रसन्न जागकर यांनी गावातील पाहिले पो.उप निरीक्षक होण्याचा मान मिळवला आहे.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कोंड का – बोर्या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले प्रसन्न जागकर हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा – २०२२ ची परीक्षा उत्तीर्ण झालेले कोंड कारुल गावातील पाहिले विद्यार्थी आहेत.त्यांची पो उप निरीक्षकपदी नियुक्ती झाली असून त्यांनी गावातील पाहिले पो.फौजदार होण्याचा मान मिळवला आहे.त्यांच्या या यशाची दखल घेवून गावाच्या सरपंच महोदया सौ.नीलिमा अडुरकर,शाळेचे मुख्या.श्री.रवींद्र माने,आणि ग्रामस्थांनी त्यांना नुकतेच कोंडकारुळ – बोर्या शाळेमध्ये समारंभपूर्वक सन्मानित केले.श्री.प्रसन्न जागकर यांना शाल,श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देवून शाळेचे मुख्या.श्री.रवींद्र माने यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.प्रसन्न जागकर यांच्या या कौतुकास्पद यशाबद्दल सरपंच सौ.नीलिमा अडुरकर, शा.व्य.स.अध्यक्षा सौ.वैष्णवी पाटील,उपाध्यक्षा सौ.प्रज्ञा पालशेतकर,श्री.राजपूत सर,श्री. रामाणे सर,श्री.धावडे सर,सौ.कोपरकर मॅडम,सौ.जाधव मॅडम,आदींनी शाळेचे आणी पर्यायाने गावाचे नाव मोठे केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

या सत्कार समारंभाला संबोधित करताना श्री.प्रसन्न अनिल जागकर यांनी हे यश प्राप्त करण्यापर्यंतचा शैक्षणिक प्रवास मांडताना उपस्थित विद्यार्थी,ग्रामस्थांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.सरपंच सौ.नीलिमा अडुरकर यांनी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.या कार्यक्रमाच प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री.अशोक पावसकर यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.