असगनी गावक्षेत्रातील पर्‍याला एमआयडीसीमधील दूषित पाणी

 

ग्रामपंचायत असगणीच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण मंडळ चिपळूणला दिले निवेदन

चिपळूण | वार्ताहर : लोटे एमआयडीसी कार्यक्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी घरडा आहे. ही कंपनी अनेक सेक्टरमध्ये विभागलेली आहे. सद्यस्थितीत घरडा कंपनीच्या बाजूला नवीन वॉल कंपाऊंडचे काम सुरू आहे. कंपनीचे बाजूने काँक्रीट मोठे गटार काढलेले आहे. या गटातील सर्व दूषित पाणी गावातून जाणाऱ्या पर्‍याला मिळत आहे. या ओढ्यातील शुद्ध पाणी दूषित होत आहे. प्रत्यक्ष ग्रामस्थांनी पाहणी केली. याचा ग्रामस्थांना नाहक त्रास होणार आहे. याबाबत असगणी ग्रामपंचायत यांच्यावतीने उप प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चिपळूण येथील अधिकारी सुशील शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

एमआयडीसीतील काही गावांना प्रदूषणाचा त्रास होत आहे. मात्र, याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष देत नाही. या गावानं पैकीच असगनी गाव आहे. घरडा कंपनीने काढलेले गटारातील दूषित पाणी गावच्या ओढ्यातून मिसळते त्यामुळे येथे शुद्ध पाणी दूषित होत आहे. कंपनीतून काढलेल्या गटारातचे सर्व दूषित पाणी आहे. त्यामुळे ओढ्यातील शुद्ध पाणी पूर्णतः दूषित होत आहे . याचा गावातील गुर् ढोर व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जीवीतहानी सुद्धा होऊ शकते असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंपनी असेल. त्यामुळे घरडा कंपनीचे सांडपाण्याची नियोजन आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करावे . असे ग्रामपंचायती यांनी दिलेल्या उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चिपळूण येथील निवेदणात नमूद केलेले आहे. हे निवेदन देताना असगणी सरपंच संजना बुरटे, उपसरपंच यासिन घारे, सदस्य चंद्रकांत गोसावी सुविंद्र धाडवे आणि माजी उपसरपंच संजय बुरटे उपस्थित होते.