मुंबई येथे १५ ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षण व सद्यस्थिती कार्यक्रम

कोकणातून ओबीसी बांधव राहणार उपस्थित

चिपळूण (वार्ताहर) : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सलग्न कुणबी युवक मंडळ मुंबई व ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र यांच्या सहयोगाने देशाच्या स्वातंत्र्यदिनी कुणबी ओबीसी आपल्या हक्क अधिकार यावर वैचारिकपणे भाष्य करण्यासाठी गुरुवार १५ ऑगस्ट रोजी स १०.३० वाजता
मुंबई दादर येथील श्री. कृष्ण मंदिर सभागृह – सदानंद जाधव मार्ग, नायगांव या सभागृहात ओबीसी आरक्षण आणि सद्यस्थिती या विषयावर विचारमंथन होणार आहे.

हा कार्यक्रम कुणबी युवाच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांच्या संकल्पनेतून होत आहे. समाजात वैचारिक प्रगल्भता निर्माण व्हावी या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून
ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे,
संघाचे प्रभारी संघाध्यक्ष सदानंद काष्टे, ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर
संघ सरचिटणीस अरविंद डाफळे, ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष जे.डी.तांडेल उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये उपोषणकर्ते व राज्य मागासवर्ग आयोग प्रा. लक्ष्मण हाके, उपोषणकर्ते व कायदेतज्ज्ञ ऍड मंगेश ससाणे मार्गदर्शन करणार आहेत. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणबी युवाध्यक्ष माधव कांबळे असणार आहेत.
ओबीसी आरक्षण आणि सद्यस्थिती या कार्यक्रमाला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळ सहयोगी – ओबीसी जनमोर्चा यांनी केले आहे.