सातेरी देवी मंदिर मार्गांवरील खड्डे स्वखर्चातून बुजवले ; सोमवारी होणाऱ्या यात्रौत्सव पूर्व मार्ग केला खड्डेमुक्त
मालवण | प्रतिनिधी : मालवण देऊळवाडा येथील सातेरी देवी मंदिर जाणाऱ्या मार्गांवर पावसात मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. येथून जाणारे मागरिक, भाविक यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच सोमवारी होणाऱ्या देवीच्या यात्रेस मोठया प्रमाणात येणाऱ्या भावीकांची गर्दी लक्षात घेता या मार्गांवरील खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. त्याची तात्काळ दखल घेत भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी या मार्गांवरील खड्डे स्वखर्चाने सिमेंट काँक्रिटने बुजवले आहेत. यावेळी दीपक पाटकर यांच्या सोबत भाजपा युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण उपस्थित होते.
आपण नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे. अशी शिकवण खा. राणे साहेब यांची नेहमीच आम्हा कार्यकर्त्यांना असते. माजी खासदार निलेश राणे हेही नेहमीच जनतेच्या मदतीसाठी असतात. त्यांच्या मार्गदर्शना नुसार जनतेला सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.
यावेळी जितु मराळ, अरविंद मराळ, बाप्पा आचरेकर, प्रमोद मराळ, पराग चव्हाण, अर्जुन चव्हाण, अशोक मराळ, उदय विर, बबन आचरेकर, जयवंत विर यांसह उपस्थित स्थानिक नागरिकांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले.











