सावंतवाडी रेल्वेस्थानक परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र वाटप

अभियंते आर्किटेक्ट व ठेकेदारांचा यथोचित सन्मान

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण
सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले. तसेच खा. नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी कोकण रेल्वेचे जनक माजी केंद्रीय रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्या तैलचित्राला अभिवादन करण्यात आले.

 

 

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, भाजयुमो राज्य उपाध्यक्ष विशाल परब, भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष, रवींद्र मडगावकर,सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक उदय नाईक, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता वैभव सगरे, सहाय्यक अभियंता प्रमोद लोहार, कोकण रेल्वेचे संचालक आर. के. हेगडे, प्रधान मुख्य अभियंता नागदत्त राव,स्थापत्य अभियंता कैलास कासार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, भाजपचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई, चद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. तर यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्हर्चुअल उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी स्थापत्य अभियंता कैलास कासार, ठेकेदारांचे प्रतिनिधी रोहित नाडकर्णी, आर्किटेक सोहम सावंत,उपविभागीय अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता वैभव सगरे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. तसेच यावेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बचत गटांच्या स्टॉलला भेट देत चर्चा केली.