भाजप नेते खास. नारायण राणे
सिंधूनगरी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग निसर्गरम्य जिल्हा असून या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कल्पकता व सुंदरता रेल्वे स्थानकांच्या शुशोभीकरणातून दिसली! या विकासाची सांगड येथील तरुणानी घालावी व विकासाच्या प्रक्रियेत सामील व्हावे. आपली बुद्धी शिक्षण व चातुर्य याचा उपयोग या तरुणांनी आपल्या प्रगतीसाठी करावा. या जिल्ह्यातील पर्यटन ही आपली लक्ष्मी असून त्याचा वापरही विकासासाठी करावा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात बोलताना केले.
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आम राजन तेली,कोकण रेल्वे संचालक आर के हेगडे, मुख्य अभियंता नागदत्त, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आधी उपस्थित होते. तर कसाल सरपंच राजन परब, रान बांबूळी सरपंच परशुराम परब, कडवे सरपंच आनंद दामोदर, अणाव सरपंच लीलाधर आणावकर, ओरोस सरपंच आशा मुरमुरे सुप्रियाताई वालालकर, संध्या तेरेसे भाई सावंत संध्या तेरसे आधी लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा दरदोई उत्पन्नात पुढे जावा हा जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर असावा म्हणून आम्हा नेतृत्वाचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. पर्यटन विकास व त्यावर आधारित व्यवसाय सुरू करून जिल्ह्याच्या विकासाला चालना द्यावी असे आवाहन नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर बसविलेला शहामृग हा रवींद्र चव्हाण यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून साकारला आहे. त्यालाही तेवढाच अर्थ आहे या कल्पकतेच्या बोध घ्यावा व शहामृग जागतिक प्रमाणे धावतो ती गती येथील युवकांनी आत्मसात करून आपली प्रगती करावी, या नव्या विकासाचा उपयोग आपल्या उद्योग व्यवसायासाठी करून घ्यावा असे आवाहन ही नारायण राणे यांनी केले.
रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणातून जिल्हा विकासाचे प्रतिबिंब दिसेल.सिंधुनगरीतील प्रशासकीय संकुलासाठी ४० कोटी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
कोकण रेल्वे हे कोकणवासीयांचे स्वप्न प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून पूर्ण झाले. जिल्ह्याच्या या विकासात जिल्हा वासियांचे योगदान मोठे आहे. रेल्वे स्थानकांचे आता झालेले सुशोभीकरण हे एक विकासाचे प्रतिबिंब आहे.रोजगारीच्या कारणामुळे युवक युवतींचे स्थलांतर ही एक समस्या असून ती थांबविण्याचा आपला प्रयत्न आहे. म्हणूनच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण ही योजना सरकारने आणली आहे. त्याचा वापर करून जिल्हा विकास साधण्याचा आपला प्रयत्न आहे. जसे रेल्वे स्थानकांचे शुशोभीकरण झाले तसेच आपल्या जिल्हा मुख्यालयाचे अर्थात प्रशासकीय संकुलाचे सुशोभीकरण होण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करणार आहोत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण लोकार्पण सोहळ्यात बोलताना केलं.
प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून कोकण रेल्वे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
कोकण रेल्वेचा हा विकास या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या होत्या त्यातून स्वप्नवत वाटणारी ही कोकण रेल्वे पूर्णत्वास गेली आहे. सिंधुदुर्ग हे रेल्वे स्थानक हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण, पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेले व जिल्हाचे मध्यवर्ती ठिकाण, अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांचा वावर असणारे हे रेल्वे स्टेशन व पर्यटन ठिकाणाला जोडणारे हे रेल्वे स्टेशन म्हणून या रेल्वे स्थानकाचा सुशोभीकरण कामात समावेश व्हावा म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेतली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात त्यांचे अभिनंदन केले. त्याला उपस्थित नागरिकांनी चांगलीच दाद दिली. भाजप नेते खास. नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण या नेतृत्वामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाल्याचेही प्रभाकर सावंत म्हणाले.
स्वार्थासाठी नको तर लोकहितासाठी कार्य करा : नारायण राणेंचा इच्छुक उमेदवारांना सल्ला
आज सावंतवाडी मतदारसंघांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आमच्याकडे डझनभर उमेदवार सावंतवाडीत आहेत. दोन महिन्यांनी होणाऱ्या निवडणुकींसाठी माझ्या शुभेच्छा. मात्र, लोकांमध्ये जाऊन काम करा, वातावरण निर्मीती करा. वैयक्तिय स्वार्थासाठी नको तर लोकहितासाठी कार्य करा. रविंद्र चव्हाण यांनी वजनकाटा आणला आहे. ते तुमच्या कार्याच्या वजनावरून १२ पैकी एक उमेदवार निवडतील अशी मिश्किल टीपणीही खासदार नारायण राणें यांनी यावेळी केली.












