कुडाळ एटीएम चोरी प्रकरणी राजस्थान मधील दोन आरोपी : मुंबई पासिंग चे वाहन गुन्ह्यात वापरले.

 

 

 जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची कौतुकास्पद कामगिरी 

सिंधुनगरी : प्रतिनिधी :कुडाळ एटीएम चोरी प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत साडेबारा लाखाची रोकड रक्कम हस्तगत करण्याची चांगली कामगिरी केली आहे. 24 तासाच्या आत सिंधुदुर्ग पोलिसांनी हा छडा लावल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे कौतुक होत आहे. राजस्थान मधील संशयित आरोपी आहेत. या गुन्ह्यात मुंबई पासिंग चे वाहन वापरण्यात आले आहे. या गुन्ह्यात चार संशयित आरोपी असून दोन आरोपींना मुद्दे मला सह पकडण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे.

रविवारी पहाटे ०४.०० वा. चे सुमारास कुडाळ पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहीतीनुसार साधना बाजार कुडाळ जवळील स्टेट बँक ऑफ इंडीया (SBI-ATM) मध्ये कोणीतरी इसम संशयास्पद हालचाली करीत असल्याबाबत माहीती मिळाली होती. त्यास अनुसरुन ठाणे अंमलदार श्री म्हापसेकर यांनी रिझर्व्ह अंमलदार मपोहवा/ श्रीम. ममता जाधव, पोना/बुथेलो, पोकों/वराडकर, पोकों/चिंदरकर यांना रवाना केले. व पोलीस निरीक्षक श्री. मगदुम यांना माहीती कळविली. पोलीस अंमलदार तात्काळ ATM जवळ पोहोचताच ATM समोरील रस्त्यावर उभी असलेली एक राखाडी रंगाची कार मधील दोन इसमांना पोलीसांची चाहूल लागताच ते कार तेथून वेगात एसआरएम कॉलेजच्या दिशेने हायवेकडे जाणारे रोडला घेऊन पळाले. त्यावेळी पोलीस अंमलदार यांना ATM शटर अर्धवट बंद करुन कोणीतरी हालचाल करीत असल्याचे जाणवले. ATM बाहेर पोलीस आल्याची चाहूल लागताच ATM मध्ये घुसलेल्या दोन इसमांनी शटर उघडून ATM चे कॅश बॉक्स घेऊन बाहेर पळाले. त्यांचेपैकी एका इसमाला पोलीसांनी कॅश बॉक्स सह पकडले. व एक इसम हिंदू कॉलनीच्या दिशेने एक कॅश बॉक्स घेऊन पळून गेला. त्याबाबत पोलीस निरीक्षक मगदुम यांना माहीती समजतात त्यांनी स्टाफसह सदर पळून गेलेल्या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर पळून गेलेला इसमाचा शोध घेत असताना हायवेवर पावशी येथे एक सायकल स्वार पोलीसांना दिसला त्यास हटकले असता त्याने त्याचे ताब्यातील कॅश बॉक्स सायकलसह टाकून जंगलमय भागात पळून गेला. त्याचा शोध घेण्याकरीता पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व स्टाफ असे रवाना होऊन पळून गेलेल्या इसमास पणदूर तिटा येथील हॉटेलमध्ये नाष्टा करीत असताना पकडलेले आहे.

 

स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा कुडाळचे ब्रैच मॅनेजर श्री. गावडे व स्टाफ यांनी आरोपींचे ताब्यातून हस्तगत केलेल्या ATM कॅश बॉक्स मधील कॅशची त्यांचेकडील नोट काऊंट मशीनवर तपासणी केली असता एकुण १२,६५,९००/- रुपये रक्कम परत मिळून आलेली आहे.

 

पोलीसांना पकडलेल्या आरोपींची नावे क्र. १ अनिल अम्मीलाल बलोदा वय २५ वर्षे, रा. रायला, टाणा- पिलानी, तहसील- सुरजगढ, जि. झुणझूनू रा. राज्यस्थान क्र. २. वारीस जफरुद्दीन खान वय २६ वर्षे रा. विलासपूर, ठाणा/तहसील- तिजारा, जि. अलवर राज्य राज्यस्थान, अशी असून फरारी झालेल्या इसमांची नावे ३. समशाद खान वय सुमारे ३५ वर्षे (पूर्ण नाव पत्ता माहीती नाही) सद्या रा. पनवेल, मुळ रा. उत्तप्रदेश व आरोपीत क्र. ४. राजू आंबेकर रा. विलेपार्ले, मुंबई (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी असल्याची अटक आरोपींकडून समजून आलेली आहेत. तसेच पळून गेलेल्या दोन आरोपींकडे मारुती झेन इस्टीलो वाहन क्र. MH ०२ CH ८०८५ हे वाहन असल्याचे निष्पन्न होत असून त्याबाबत तपास चालू आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.