राजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धा

 

 

राजापूर / प्रतिनिधी – राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने केंद्र शासनाकडुन प्राप्त सुचनांनुसार हरघर तिरंगा अभियान अंतर्गत राजापूर शहरातील नवजीवन हायस्कूल राजापूर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . सदर स्पर्धेमध्ये 1,2,3,4 असे क्रमांक काढून त्यांना शालेय वस्तू बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

यावेळी एहसास प्रणाली अंतर्गत सायबर क्राईम, ऑनलाईन फसवणूक, मोबाईल वापराचे फायदे व तोटे, नवीन कायद्याची थोडक्यात माहिती तसेच महिला व बाल हक्क अत्याचार या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. व विद्यार्थाना सतर्क राहणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमावेळी राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक राजाराम चव्हाण , नवजीवन हायस्कूलचे मुख्याद्यापक श्री . वनमाने , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते .

 

*