तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या गेटवर तिरंगा कलर मध्ये रोषणाई 

 

 

दोडामार्ग l सुहास देसाई :हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिलारी धरणातून पाणी विसर्ग होणाऱ्या सँडल डॅमवर तिरंगा कलर मध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी धरणात असणारे पाणी सांडव्यावरून सोडण्यात आले आहे. ही रोषणाई 13 ऑगस्ट 2024 पासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत दररोज सायंकाळी 7.30 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचा विसर्ग अंदाजे 100 क्युमेश असणार आहे. त्यामुळे नदी पात्रात अचानक पाण्याचा लोंढा येऊ शकतो. त्यामुळे नदीतील सर्व कॉजवे ( पाईप मोरी) वरुन पाणी वाहणार आहे. त्यामुळे दिनांक 13.8.2024 ते 16.8.2024 या कालावधीत पुलावरून पाणी असताना ये जा करू नये, नदीकाठी जाऊ नये अणि नदीकाठी विशेष काळजी घ्यावी. असे आवाहन तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक बा.जाधव यांनी केले आहे