आजचा दिवस कसा जाईल? 15 ऑगस्ट 2024, गुरुवार.

मेष रास

आज तुम्हाला इतरांसोबत काही गोष्टी शेअर कराव्या लागतील. परंतु गोष्टी शेअर करा, त्याचा त्याग करू नका आणि तसे करताना हे लक्षात ठेवा. आज घर कुटुंब समाज कम्युनिटी इत्यादीसाठी काही वेळ तुम्हाला द्यावा लागेल. देवासमोर दिवा लावा. तसेच उबदार ठिकाणी बसण्याने एनर्जी लेव्हल चांगल्या राहतील.

वृषभ रास
आज तुम्ही जे शिकला आहात ते इतरांना शिकवा. नवीन शिकण्याची संधी मिळेल. वडील तसेच गुरु, शिक्षक, इत्यादींशी संबंधित काम करण्याची संधी मिळेल. जागेत बदल होण्याची शक्यता आहे. धार्मिक संस्थांशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान आणि परदेशी जाण्याची संधी मिळेल.

मिथुन रास
आज घरातील मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः चार वर्षाखालील मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. आज थोडे वेगळे किंवा लांब राहून सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे. प्रेमात फसवणूक होऊ शकते. जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू शकता. हेल्थची काळजी घ्यावी लागेल.

कर्क रास
आज तुम्हाला प्रोफेशनल लाईफ कडे लक्ष देण्याची गरज पडेल. सोशल मीडिया तसेच वेबसाईट वेळीच अपडेट करा. घरातून सपोर्ट मिळेल. फॅमिली समोर तुम्ही शाईन कराल. तेव्हा वेगळाच अभिमान तुम्हाला वाटेल. छोट्या छोट्या गोष्टीत अहंकार मध्ये अडवा येणार नाही याची काळजी घ्या.

सिंह रास
आज इतरांच्या हेतूकडे लक्ष देण्याची गरज आहे. गुप्त शत्रू आणि हितचिंतक असे एकत्र दोन्ही व्यक्ती आणि विषय तुम्हाला एकत्र अनुभवता येतील. आज मनातली भीती काढून टाकून पुढे जा. सकाळी पित्ताचा, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

कन्या रास
आज तुम्ही इमेज सांभाळायचा प्रयत्न करा. इतरांचे तुमच्याविषयी गैरसमज होतील. ठरवून कामे करा. आज एखादी हरवलेली वस्तू सापडेल.

तुळ रास
आज तुमच्यासोबत एका नंतर एक अशा गोष्टी घडतील की तुम्हाला वेळच मिळणार नाही. आश्चर्यचकित होण्या इतपत काही धक्के बसतील. परंतु दिवस अखेर या सर्वाचा तुम्हाला फायदाच होईल. आज वारा येईल तशी पाठ फिरवायची ही एकच गोष्ट लक्षात ठेवा. जेवढा बदल करण्याची तयारी ठेवाल तेवढा दिवस चांगला जाईल.

वृश्चिक रास
आज तुमच्या दुखऱ्या नसेवर कोणीतरी पाय ठेविल.  चिडचिड होईल. भूतकाळात घडून गेलेल्या काही गोष्टी पुन्हा नव्याने घडत आहेत अशी भीती तुम्हाला वाटेल. भ्रमाची स्थिती राहील. नीट निर्णय घेता येणार नाहीत. प्रायव्हेट पार्ट शी संबंधित एखादा त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु रास
आज जे काही होईल घडेल ते तुम्ही देवाच्या चरणी अर्पण करा. धुक्यात वाट शोधण्यासारखी स्थिती आज तुमची असेल. नातेसंबंधांना महत्त्व द्या. लव लाईफ पार्टनर सोबत कुठेतरी सुंदर जागी जाऊ शकता. काही वेळ शांततेत बसण्याचा फायदा होईल.

मकर रास
आज पाण्यापासून संसर्ग होऊ शकतो. तसेच इतरही पाण्याच्या ठिकाणांपासून लांब रहा. स्टेशनरी तसेच आर्ट सप्लाई च्या व्यवसायात फायदा होईल. सतत भूक लागण्याचा त्रास होऊ शकतो. अचानक उदास वाटेल. मूड बदलत राहतील.

कुंभ रास
आज गुप्त गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाढेल. अवैध अनैतिक संबंधांपासून लांब राहा. अडकलेले पैसे मिळण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल. ऑफिसमध्ये पॉवर स्ट्रगल पाहायला मिळेल.

मीन रास
आज कुटुंबासोबत वेळ घालवा, जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. परंपरागत चालत आलेल्या काही कार्यात तुम्हाला भाग घ्यावा लागेल. पाठीची काळजी घ्या. अचानक वजन उचलणे, भार पडणे अशा प्रकारे ताण येऊन पाठीचे दुखणे वाढू शकते.

@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
++++++++++++++++++++++++++++++