ढोल ताशा च्या गजरात करणार रस्त्याच्या खड्यांचे पुजन
खेड (प्रतिनिधी ) कोकणातील सर्वात मोठा गौरी-गणपतीचा सण ऐन तोंडावर आलेला असताना मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्या मुळे वाहने हाकणे देखील मुश्किल बनले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या या नाकरतेपणामुळे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे पर्यावरण विभाग रत्नागिरी जिल्हाप्रमुख किरण तायडे आक्रमक झाले असून १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा भरणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या शेजारी (चौक) येथे गांधीगिरीचा अवलंब करून ढोल ताशाच्या गजरात खड्यांमध्ये पुष्प वाहून निषेध व्यक्त करणार आहेत
मुंबईच्या चाकरमान्याप्रमाणेच खेड तालुक्यात पडलेल्या खड्यामुळे या रस्त्यावरून दररोज दळणवळण करणारा खेड तालुक्याचा रहिवासी असलेला नागरिक देखील त्रस्त झाला आहे.वाहनांचे नुकसान मोठ्याप्रमाणावर होत आहे.रिक्षा व्यावसाईक हतबल झाला आहे. सामान्य माणूस गप्प बसला आहे,त्याचा गैरफायदा रस्ते बनवणारे ठेकेदार व प्रशासन घेत आहेत असा आरोपही तायडे यांनी केला असून . तसे निवेदन . कार्यकारी अभियंता सर्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांना देण्यात आले आहे,
याप्रसंगी काँग्रेस सेवादल जिल्हाप्रमुख मा.श्री. टी. डी. पवार, माजी नगरसेवक श्री. बशीरभाई मुजावर, युवक तालुकाध्यक्ष श्री. स्वराज गांधी, शहराध्यक्ष श्री.अनिल सदरे, खेड पर्यावरण तालुकाप्रमुख श्री. अनंत पवार, व जिल्हा प्रमुख (पर्यावरण) किरण तायडे उपस्थित होते.











