खेड बसस्थानकातून पाच तोळ्याचे मंगळसूत्र लंपास

खेड(प्रतिनिधी)
बेळगाव-दापोली बसमधून प्रवास  करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या पर्समधून ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना येथील बस स्थानकात गुरुवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. यानंतर तातडीने बस येथील बस स्थानकातून पोलीस स्थानकात आणण्यात आली. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली.  बेळगाव-दापोली बसमधून ( एम. एच.४०/एन ९७३०) एक महिला प्रवासी प्रवास करत होती. ही महिला कराड़ बस स्थानकात बेळगाव- दापोली बसमध्ये चढली. ही बस येथील स्थानकात दाखल झाल्यानंतर तिने पर्सची तपासणी केली असता ३ लाख रुपये किंमतीचे ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. ही बाब वाहकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बस थेट पोलीस स्थानकात आणण्यात आली. बसमधील सर्व प्रवाशांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या विशेषतः कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये पर महिलांचे दागिने हिसकावण्याचे सत्र सुरू असतानाच बसस्थानकातूनही गर्दीचा फायदा उठवत महिलांचे  दागिने चोरण्याचे प्रकार वाढीस  लागल्याने प्रवाशांची सुरक्षितता  ऐरणीवर आली आहे. सुट्टीच्या हंगामासाठी गावी आलेल्या दोन महिलांच्या पर्समधील दागिने बसस्थानकातून अज्ञात  चोरट्याने लांबवले होते. ही घटना त्रा ताजी असतानाच एका महिला  प्रवाशाचे ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र  अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने लो एकच खळबळ उडाली  येथील पोलिसांकडून मंगळसूत्र लंपास करणाऱ्याचा कसून शोध सुरू आहे.