खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण

मंडणगड | प्रतिनिधी : खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संगणकावरील टंकलेखनाचे शासनमान्य तीन कोर्स मोफत दिले जाणार आहेत. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संगणक संघटनेचे राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय राणे यांनी केले आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारा शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग (जीसीसी-टीबीसी) हे 6 महिन्याचे 3 कोर्स रत्नागिरी जिल्ह़यात मोफत शिकविले जाणार आहेत. जिल्ह़यातील ब्राम्हण, राजपूत, मारवाडी, राजपूरोहीत, येलमार, जैन या समाजातील मुलां-मुलींना 100 टक्के विनामुल्य शिकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. शासनाच्या अमृतचा लक्षगट निश्चित करून खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळ मार्फत समकक्ष योजनांचा लाभ मिळत नाही.

 

 

अशा जातींचा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार की ज्यांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे असा आहे. अमृतच्या लक्षीत गटात ब्राम्हण, बनिया, वंत्स, कम्मा, कायस्थ, कोमटी, ऐयांगर, नायर, नायडू, पाटीलदार, बंगाली, पटेल, राजपूत, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनगनथर, वैष्य, राजपुरोहित, गुजराथी इत्यादी जातींचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह़यातील शासनमान्य संस्थेकडून कॉम्प्युटर टायपिंग कोर्सचे प्रशिक्षण विनामुल्य पूर्ण करण्यासाठी निवड प्रक्रिया राबविल्या जाणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी कोणत्याही प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

 

 

अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल़्या निकालाची स्वःसाक्षांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील. त्याच बरोबर संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या शुल्काची स्वःसाक्षांकित पावती गरजेचे आहे. उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल व रद़द झालेल्या चेकची प्रत जोडावी. अमृत राज्य अमृतच्या लाभार्थी निकशांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहीत नमुन्यामध्ये संस्थेच्या व महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावित. या शिवाय इतर माहितीसाठी जिल्ह़यातील कोणत्याही शासनमान्य संगणक-टायपिंग संस्थेला भेट देवून माहिती जाणून घ्यावी असे उपाध्यक्ष संजय राणे यांनी केले आहे.