मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अठरा वर्षिय युवतीस घराचे शेजारी राहणाऱ्या युवकाने मंडणगड बाजार पेठेतून अज्ञात कारणाने फुस लावुन तिला पळवून नेत तिचे अपहरण केल्याची तक्रार मुलिच्या वडीलांनी 16 ऑगस्ट 2024 रोजी मंडणगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यावरुन अल्ताब बशीर शेख राहणार मेनरोड शेवाडी ता लोहा जि. नांदेड या संशयीताच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) 2023 चे कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार 14 ऑगस्ट 2024 रोजी अपहरण झालेली युवती सकाळी 07.45 वाजात नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली ती नेहमी 12.30 वाजण्याच्या सुमारास कॉलेजवरुन घरी परत येते. नेहमीच्या वेळी ती घरी परत न आल्याने फिर्यादी वडीलांनी तिला शोधण्यासाठी महाविद्यालयात जाऊन तिच्याविषयी चौकशी केली असता ती कॉलेजमध्ये नसल्याचे आढळून आले. त्यामुळे फिर्यादी यांनी मुलिच्या मैत्रिणी, शहरातील बाजारपेठ, शेजारी पाजारी व नातेवाईक अशा सर्व ठिकाणी शोध घेतला असता तिच्याविषयी काहीही माहीती आढळून आली नाही. शोध घेता घेता नमुद संशयीत युवकाने मुलीस सकाळी 07.45 वाजता मंडणगड बाजारपेठेतून कोणत्यातरी अज्ञात कारणावरून तिला पळवून नेलेले असल्याचे फिर्यादी पित्यास समजले. त्यामुळे संशयित युवकाचे विरुध्द आमची कायदेशीर तक्रार असल्याचे म्हणणे नमुद केले आहे. मुलीचे वय 18 वर्षे 8 महिने 8 दिवस इतके असून, तिचे केस व डोळे काळे आहेत. कानात सोन्याची कर्ण फुले हातात, साध्या बांगड्या, पायात पैजण घातले आहे. तिने निळ्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगीज घातली आहे पाठीवर मरुन रंगाची कॉलेज बँग ही आहे. तिला मराठी हिंदी या दोन भाषा अवगत आहेत. मुलीचे पालकांचे तक्रारीनुसार मंडणगड पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करुन पोलीसांनी तपास सुरु केला आहे. दोषीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांनी पालकांना आश्वस्त केले असून शहरातील कायद व सुव्यवस्थितीची परिस्थिती उत्तम राहवी यासाठी नागरीकांनी पोलीस प्रशासनास शांततामय मार्गाने सहकार्य कऱण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून कऱण्यात आले आहे.
चौकट
घडलेला प्रकाराची माहिती शहर परिसरात समजतात शहरातील नागरिक व्यापारी वर्ग व नातेवाईक मंडणगड पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात जमा झाले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते











