रत्नागिरी | प्रतिनिधी :मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने आणि रस्ते अनेक ठिकाणी नादुरुस्त असल्याने अनेक वाहन चालक उक्षीचा मार्ग वाहतुकीसाठी निवडताना दिसत आहेत.
मात्र लहान गाड्यांसह आता ट्रक ट्रेलर सारखी अवजड वाहने सुद्धा याच निमुळत्या आणि तीव्र उतारावरून जाऊ लागल्याने अनेकदा वाहतुकीला अडथला मनिर्माण होताना दिसतो. सोमवारी असंच के भला मोठा ट्रेला उक्षीच्या अवघड वळणावर अडकून पडला होता. यामुळे बराच काळ हा रस्ता बंद होता तर या अवघड वळणावर ता ट्रेलर पुढे नेणे सुद्धा जिकरीचे होते. वास्तविक अशा अवजड वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास मनाई करणे आवश्यक असून याबाबत परिवहन विभागाकडून ठोस कारवाई होणे आवश्यक आहे.











